श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कुलमध्ये पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री शहाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण

1 min read

शिक्रापूर दि.१५:- सिद्धिविनायक पब्लिक स्कुल (शिक्रापूर) मध्ये नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री शहाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. स्कुलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नाटिका, नृत्य यांसारखे विविध गुणदर्शन कार्यक्रम प्रस्तुत केले. प्राथमिक व उच्च माध्यमिक वर्गांनी परेड, पिरॅमिड सारख्या विविध गुणदर्शन पर कार्यक्रमांनी स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटिकेने सर्वांची वाहवा मिळविली. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी भाग्यश्री शहाणे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे तसेच शालेय जीवनात अभ्यास व परिश्रमाचे महत्व पटवून दिले. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक सोमनाथ सायकर, चेअरमन मनीषा सायकर, विश्वस्त साकोरे सर, विश्वस्त अक्षय गायकवाड सर, विश्वस्त सपना सायकर, विश्वस्त प्रांजल गायकवाड विश्वस्त पंढरीनाथ राऊत, विश्वस्त निखिल वाव्हळ, विश्वस्त शीतल सायकर, विश्वस्त अजिंक्य गायकवाड, विश्वस्त सुरेश शिंदे,विश्वस्त महेंद्र पटेल, विश्वस्त नवनाथ वाव्हळ आदी उपस्थित होते व सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्राचार्य गौरव खुटाळ , उपप्राचार्या उज्ज्वला दौंडकर, सहशालेय उपक्रम विभाग व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,ड्रायव्हर्स आदींनी नियोजन केलेल्या या कार्यक्रमाची खाऊ वाटप करून सांगता करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे