स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांचा मदतीचा हात

1 min read

औरंगपूर दि.१५:-स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा औरंगपूर (ता.जुन्नर) ला ग्रामस्थांनी मदतीचा हात दिला.याप्रसंगी शाळेमध्ये प्रभात फेरी, ध्वजारोहण, विद्यार्थ्यांची भाषणे, बक्षीस वितरण ,व्याख्यान इ . कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एकनाथ डुकरे (राम कृष्ण हरी वस्त्र भांडार) यांनी भूषविले. ग्रामस्थ व पालक,महिला वर्ग यांची लक्षणीय उपस्थिती या प्रसंगी होती.शाळेतील 50 टक्के विद्यार्थांनी भाषणे करत भारताच्या स्वातंत्र्याची माहिती सांगितली. तसेच लोकसहभागातून ठेविंचे व्याज व लोकसहभाग यामधून मुलांना बक्षिसे व शैक्षणीक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रा.शाकुराव कोरडे सर यांनी मोबाईल चे दुष्परिणाम या विषयावर बोलताना पालकांना मार्गदर्शन केले. स्वर्गीय शिवाजी दादा डुकरे यांचे स्मरणार्थ शाळेतील आदर्श विद्यार्थ्यांचा सन्मान पत्र व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.निपुण भारत अभियान, तंबाखूमुक्त अभियान अंतर्गत सामुहिक शपथ घेऊन जनजागृती आली. निपुण भारत अंतर्गत माता पालक गटांचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला.याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे नवनियुक्त अध्यक्ष सागर धर्मा डुकरे व उपाध्यक्ष अशोक डुकरे सर्व सदस्य यांनी शाळेसाठी 15000 रुपये किमतीचा ब्लूटूथ स्पीकर सेट भेट दिला. तसेच आगामी काळेत शाळेमध्ये डिजिटल स्क्रीन बसवण्यासाठी अनेक सन्मा. देणगी दारांकडून 70 हजार रुपये देणगी जाहीर करण्यात आली. व उर्वरित रक्कमेसाठी मुंबईकर ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सुजाता गणेश डुकरे यांनी मुलांसाठी शैक्षणीक साहित्य भेट दिले.ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त करत शाळेचे कौतुक केले. ग्रामस्थांच्या वतीने सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी सहकार्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे