श्री जे. आर गुंजाळ इंग्लिश स्कूलमध्ये डॉ.प्रदीप गुंजाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण

1 min read

आळेफाटा दि.१५ :- येथील श्री जे. आर गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल, अँड जुनियर कॉलेज या इंग्रजी माध्यमिक शाळेत मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रदीप गुंजाळ तसेच सेक्रेटरी मीना गुंजाळ व डॉ दिपक हांडे, गोपीनाथ कुटे, सुभाष लोंढे उपस्थित होते.पालक व माजी विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित होते.डॉ प्रदीप गुंजाळ, सेक्रेटरी मीना गुंजाळ व डॉ. दिपक हांडे, गोपीनाथ कुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेचे प्राचार्य सतीश पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाचे भाषण व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी छान परेड सादर केली.परेड साठी जिने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले. त्यामध्ये सर्वांचे लक्ष भाषण स्पर्धा आणि देशभक्तीपर वेशभूषा स्पर्धेने वेधले. वेशभूषा स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी विविधतेतुन एकता अशा वेशभूषा केल्या होत्या. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व व स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्यसेनानी चे योगदान याविषयी मार्गदर्शक भाषणे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले केले. विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या च्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नारे लावून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्राचार्य सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरिता लेंडे, विष्णू भोसले, पर्यवेक्षक म्हस्के व सर्व शिक्षक स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे