मातोश्री ग्लोबल संकुलातील विद्यार्थ्यांना रोबोट तज्ञ प्रितेश संकले यांनी दिले रोबोट बनवायचे धडे

1 min read

कर्जुले दि.११:- मातोश्री ग्लोबल स्कूल कर्जुले (ता.पारनेर) येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील शिक्षक, पालक व संस्था चालक मेळावा मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानचे सेक्रेटरी किरण आहेर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला. या वेळी विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग व गणिताचा उपयोग करून विद्यार्थ्यास शालेय जीवनातच रोबोट बनविण्याकरिता अहमदनगर येथील रोबोटचे तज्ञ प्रितेश संकलेच्या यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणही पालक मेळाव्यात आयोजित करण्यात आले होते.

यामध्ये विद्यार्थ्यांनी व पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला व रोबोटिक्सच्या विविध भूमिकांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन घेतला. सदर मेळाव्यात शाळेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश व्यास यांनी सर्वप्रथम प्रास्ताविक करून शाळेत विद्यार्थ्यांचे भाषा ज्ञान व कौशल्य, विज्ञान व गणित विषयात विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी व या विषयांमध्ये प्राविण्य मिळवावे याकरिता शाळेने चालविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना व कल्पकतेला संधी मिळावी म्हणून सर्व विषयांचे वेगवेगळे क्लब स्थापन केले असून त्यात त्या त्या विषयाचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना सामूहिक चर्चेद्वारे व त्या विषयातील तज्ञ शिक्षकांद्वारे दिले जाते अशी माहिती व्यास यांनी आपल्या भाषणात शेवटी सांगितली.सदर मेळाव्यात संस्थेचे सेक्रेटरी किरण आहेर यांनी संस्थेने मातोश्री ग्लोबल स्कूल लवकरच सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) न्यू दिल्लीशी संलग्न करणेची प्रक्रिया सुरू केल्याचेही जाहीर केले.प्राथमिक विभागाच्या समयन्वयक अनिता आवटी यांनी नर्सरी ते इयत्ता चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या झालेल्या प्रगतीची माहिती सादर केली. तसेच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये पालकांचाही फार मोठा सहभाग असतो म्हणून पालकांनीही काही वेळ आपल्या पाल्यासाठी देऊन त्यांचीअभ्यासाबाबत रोज चौकशी करून त्यांना त्यांचे गृहपाठ तसेच अभ्यासासाठी प्रवृत्त करावे अशी विनंती याप्रसंगी केली.शाळेच्या प्राचार्या शितल आहेर यांनी चालु शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर राबविण्यात येणाऱ्या सर्व विविध उपक्रम व आयोजनाची माहिती देऊन पालकांनी मातोश्री ग्लोबल स्कूल वर जो विश्वास टाकलेला आहे. त्याबद्दल आभार मानून प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैयक्तिक विकासासाठी शाळा व शिक्षक वर्ग कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही याप्रसंगी दिली.सदर मेळाव्यात संस्थेचे सेक्रेटरी किरण आहेर यांच्या हस्ते मागील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये सायन्स ओलंपियाड फाउंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या सत्यम कोल्हे इ ४ थी यास रौप्य पदक व क्रॅश कार्ड चे रु.१०००।- तसेच सर्टिफिकेट देऊन त्याचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे इंग्लिश ओलंपियाड मध्ये इ.३ री मधील यश डोळस, पियुष पंडित यांना अनुक्रमे कास्य पदक व रु.१०००/- रोख, रक्कम,रू.५००।- रोख व प्रमाणपत्र देण्यात आले.तर इ. २ री मधील विद्यार्थी सात्विक झावरे यासही प्रमाणपत्र व क्रॅश कार्डचे रु.५००।- देऊन त्याचे अभिनंदन करण्यात आले. तसेच आरोही पवार इ.५वी हिला मॅथ ओलंपियाड मध्ये प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फरिद पटेल यांनी केले. शिक्षक पालक व संस्थाचालक मेळाव्याचे संयोजन संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक यशवंत फापाळे व शाळेच्या शिक्षिका राणी रासकर यांचे होते. शेवटी सर्व पालकांचे संस्थाचालकांचे तसेच उपस्थित सर्व शिक्षकांचे आभार संध्या निवडुंगे यांनी व्यक्त केले.सदर मेळाव्यात सर्व वर्गातील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने हजर होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे