श्री.जे.आर गुंजाळ इंग्लिश स्कूल मध्ये आदिवासी दिन उत्साहात साजरा

1 min read

आळेफाटा दि.९:- श्री.जे.आर गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आळेफाटा (ता.जुन्नर) येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. क्रांतिकारक बिरसा मुंडा व आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शासनाच्या आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आमच्या शाळेत जव्हार, शहापूर, घोडेगाव, डहाणू येथील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांनी आदिवासी जीवन व क्रांतिकारक यांच्या जीवनावर भाषणे केली व कार्यक्रम साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी पारंपारिक आदिवासी नृत्य सादर करून आदिवासी जीवनाचे दर्शन घडवले.
या यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रदीप गुंजाळ सेक्रेटरी मीना गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य सतिश पाटील व पर्यवेक्षक विठ्ठल म्हस्के उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुनम शेळके व नरपत चौधरी व सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे