दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा
1 min read
निमगाव सावा दि.९:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात निमगाव सावा (ता जुन्नर)
9 ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. क्रांतिदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना एकाकाचे उद्घाटन मा. प्राचार्य डॉ. छाया जाधव त्यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आदिवासी संस्कृती जोपासणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. नवव्या शतकात आर्य लोक भारतात येऊन गंगेच्या सुपीक खोऱ्यात वर्चस्व मिळवून त्यांनी वसाहती केल्या. त्या ठिकाणचा स्थानिक समाज दऱ्या खोऱ्यात, जंगलात विखुरला गेला व राहू लागला. कालांतराने पुढे त्यांना आदिवासी ओळखले जाऊ लागले.
आजकाल अनेक लेखकांनी आदिवासी वर लेखन करून आदिवासी संस्कृती जोपासण्याचे तसेच आदिवासींच्या कथा आणि व्यथा सामाजिक करण्याचे कार्य केले. आपल्याही आंबेगाव, जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने पुढे आणण्याचे कार्य केले.
9 ऑगस्ट ची क्रांती खऱ्या अर्थाने जनतेचा उठाव होता. आजच्या युवकांनी या इतिहासातून प्रेरणा घ्यावी आणि आपले उज्वल भविष्य घडवावे. असा संदेश दिला. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.छाया जाधव यांनी आजचा युवक आणि राष्ट्रीय सेवा योजना या विषयावर मार्गदर्शन केले. आज देशाला दारिद्र्य, पर्यावरण प्रदूषण, आरोग्याच्या समस्या सोडवायच्या असतील तर नव्या क्रांतीची गरज आहे आणि ही क्रांती तुमच्यासारखे युवकच करु शकतात.
ज्या दिवसाने संपूर्ण भारत देश जागा झाला तो दिवस आजचा क्रांतीचा. महाविद्यालयात १३ वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजना कार्यरत आहे. या माध्यमातून रासेयो स्वयंसेवकांनी अनेक जनहिताची, समाज उपयोगी, पर्यावरण पूरक कार्य केलेले आहे. यापुढेही आपल्याला हे कार्य अधिक जोमाने करावयाचे आहे. त्यासाठी तुमच्यासारख्या युवक-युवतींनी राष्ट्रीय सेवा योजनेत स्वयंप्रेरणेने सामील होऊन आपल्या देशाच्या सेवेस, समाज कार्यास आणि प्रगतीस योगदान द्यावे.
अशी अपेक्षा व्यक्त करुंन सर्वांनां क्रांतिदिन व आदिवासी दिनाच्या शुभेच्छा शुभेच्छा दिल्या. प्रा नीलम गायकवाड यांनी प्रास्ताविकामध्ये क्रांती दिनाचे महत्त्व विशद केले. त्या म्हणाल्या 9 ऑगस्ट 1942 च्या चळवळीत सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधीसह कॉग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अटकेनंतर अरुणा असफ अली यांनी ऑल इंडिया कॉग्रेस नेतृत्व केले. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी ‘९ ऑगस्ट’ हा ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो.
इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट, अर्थात क्रांती दिन! स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस, पण स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यात दंग असलेल्या आजच्या पिढीसाठी हा दिवस ‘अनोळखी’ झाला आहे. सर्वांच्या हृदयात क्रांतिवीरांची ती मशाल आठवणीच्या रूपाने धगधगत राहणे अपेक्षित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य डॉ.छाया जाधव, संस्था प्रतिनिधी कविता पवार, प्रा.प्रल्हाद शिंदे, प्रा.अनिल पडवळ, प्रा.सुभाष घोडे, प्रा. आशिष गाडगे, प्रा. ज्योती गायकवाड, प्रा. नंदा आहेर, प्रा. प्रवीण गोरडे, प्रा. शितल कांबळे, प्रा.आकाश धुमाळ महाविद्यालयीन सर्व विद्यार्थी उपस्थित होते.