समर्थ अभियांत्रिकी मध्ये सात दिवसीय कौशल्य विकास कार्यक्रम
1 min read
बेल्हे दि.९:- समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बेल्हे (ता.जुन्नर) आणि इन्स्टिट्युशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसीय कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन इन्स्टिट्युशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स चे अध्यक्ष डॉ.विरेंद्र शेटे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत,अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.धनंजय उपासनी.इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली-कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख प्रा.निर्मल कोठारी,कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाच्या प्रमुख प्रा.स्नेहा शेगर,मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा.अमोल खातोडे,सिव्हिल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा.प्रविण सातपुते तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये टॉप लेव्हल ला असणारा विषय म्हणजे ब्लॉक चेन.अगदी कुठलेही छोटे मोठे ऑनलाईन,नेटबँकिंग किंवा तत्सम व्यवहार असोत त्यासाठी सुरक्षा हि असावीच लागते.ती सुरक्षा ज्या प्रक्रियेद्वारे किंवा ज्या गोष्टीमुळे मिळते ती म्हणजे ब्लॉक चेन.कौशल्य विकास कार्यक्रमाचा विषय ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय हे समजून घेणे आणि त्याचे फायदे विद्यार्थी,पालक,शिक्षक तसेच समाजातील प्रत्येकाला समजावेत या हेतूनेच हि कार्यशाळा आयोजित केल्याची माहिती प्राचार्य डॉ.धनंजय उपासनी यांनी दिली.
डॉ.विरेंद्र शेटे उपस्थितांशी चर्चात्मक संवाद साधताना म्हणाले कि,ब्लॉक चेन हि इमर्जिंग टेक्नॉलॉजी राहिलेली नसून ती आता प्रगत काळाची गरज झालेली आहे.इन्स्टिट्युशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स नवी दिल्ली चा वार्षिक कार्यक्रम यशदा संकुल,पुणे येथे १५ ते १७ सप्टेंबर २०२३ दरम्यान आयोजित करण्यात येणार असून आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन डॉ.विरेंद्र शेटे यांनी केले.
सात दिवसीय कार्यक्रमामध्ये ब्लॉक चेन या विषयावर विविध तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार असून सदर सात दिवसांची कार्यशाळा यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा.निर्मल कोठारी यांनी तर आभार प्रा.स्नेहा शेगर यांनी मानले.