घरात एकटी महिला असल्याचा फायदा घेत मारहाण करून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या तिघांना पोलिसांनी केली अटक

1 min read

मंचर, दि. १३:- पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथे राहणाऱ्या ज्येष्ठ महिला हौसाबाई चंदर वारे (वय ८०) या महिलेला मारहाण, धक्काबुक्की करत तिच्या गळ्यातील ४५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले.पोंदेवाडी येथील हौसाबाई वारे यांची तीनही मुले कामानिमित्त बाहेर राहत असून, त्या एकट्याच घरी असल्याचा फायदा घेत गावातीलच दीपक जाधव याने अचानक घरात प्रवेश करत. त्यांना मारहाण करत गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, ५ हजार रुपयांचे सोन्याचे बुद्धांचे चक्र असे ४५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. या घटनेत हौसाबाई वारे जखमी झाली असून, त्यांनी फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा घडल्यानंतर दीपक जाधव फरार झाला होता. पारगाव पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने हा गुन्हा पंकज म्हातारबा वाळुंज (वय २२) आणि हार्दिक निवृत्ती पोंदे (वय १८, दोघे रा. पोंदेवाडी) यांच्यासह कट करून केल्याचे कबूल केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे