जुन्नर,आंबेगाव, शिरुर,खेड तालुक्यातील मंदिरांत चोरी करणारे तिघे गजाआड; गुन्हे शाखेची जबरदस्त कारवाई; ३२ गुन्ह्यांची उकल
1 min readजुन्नर दि.१६:- जुन्नर-खेड विभागातील मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी मार्गदर्शन करून एक पथक नेमले होते.स्थागुशा चे पथकाने मंदिर चोरीतील गुन्हयाचे घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून बातमीदारामार्फत आरोपींची ओळख पटविली. गुन्हयातील चोरटे हे सराईत असून वेगवेगळया जिल्हयाचे रेकॉर्डवरील आहेत अशी माहिती बातमीदारामार्फत मिळाल्याने आरोपींचा शोध घेत असताना. दि.१४/०८/२०२३ रोजी टोळीचा म्होरक्या १) भास्कर खेमा पथवे वय ४६ वर्षे रा. नांदुर दुमाला ता संगमनेर जि अहमदनगर यास घोडेगाव परीसरातून पथकाने ताब्यात घेतले. त्याचे कडील चौकशीत त्याने जुन्नर, मंचर, कान्हूर मेसाई, लेण्याद्री येथील मंदिरात त्याचा साथीदार २) सोमनाथ शिवाजी भुतांबरे वय २४ वर्षे, रा. समशेरपुर ता अकोले जि अहमदनगर याचे मदतीने केले असून. चोरीचे चांदीचे दागिने ३) राजेंद्र रघुनाथ कपिले वय ६२ वर्षे, रा संगमनेर ता संगमनेर जि अहमदनगर यास विक्री केले असल्याचे सांगितले असता त्यास ताब्यात घेवून मंदिर चोरीतील पाच किलो ग्रॅम वजनाची चांदीची गणपतीची मुर्ती सह एकूण सहा किलो सातशे ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने रु.४,६७,०००/- किमतीचे हस्तगत करण्यात आलेले आहेत.
आरोपी सोमनाथ भुतांबरे यास लेण्याद्री फाटा जुन्नर येथून बातमीचे आधारे ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून पुणे ग्रामीण जिल्हयातील एकूण चार गुन्हे उघडकीस आले असून अहमदनगर व नाशिक जिल्हयातील मंदिर घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याचे आरोपींनी सांगितले आहे. आरोपी कडुन उघडकीस आलेले गुन्हे १) जुन्नर पोस्टे गुरनं ३२७ / २०२३ भादंवि ४५७,३८० २) जुन्नर पोस्टे गुरनं १६० / २०२३ भादंवि ४५७,३८० ३) शिक्रापूर पोस्टे गुरनं ७१३/२०२३ भादंवि ३७९ ४) मंचर पोस्टे गुरनं २८८/२०२३ भादंवि ३७९
मंदिराबाबत नागरीकांच्या धार्मिक भावना व श्रद्धा जोडलेली असून जुन्नर शहरातील ग्रामदैवत असलेले गणेश मंदिरात दररोज हजारो नागरीक श्रद्धेने दर्शनास येत असतात. अष्टविनायकापैकी एक असलेले लेण्याद्री मंदिरातील गिरीजात्मज गणपती मंदिरात लाखो भाविक राज्यातून दर्शनासाठी येत असतात. कान्हुर मेसाई येथील जागृत देवस्थान असलेले कुलदेवी मेसाई देवीचे मंदिरात वर्षभर भाविक दर्शनाला येतात आणि नवरात्र उत्सव मोठया प्रमाणात साजरा होतो आणि नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे.
मंचर जाधववाडी परीसरातील तुकाई माता मंदिरात देखील पंचक्रोशीतील नागरीक दर्शनासाठी जात असून नवरात्र उत्सव थाटामाटात साजरा केला जातो.वरील प्रमाणे नागरीकांचे श्रद्धास्थान असणारे मंदिरामध्ये चोरी झाल्याने नागरीकांमध्ये नाराजी आली होती. चोरीच्या घटना चिंतेचा विषय झालेला असल्याने मा पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष देवून वेळोवेळी मार्गदर्शन व सुचना केल्याने मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
मंदिर प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील वस्तीतील मंदिरांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच मंदिरातील दागिन्यांचे सुरक्षेबाबत योग्य उपाययोजना करणेबाबत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी आवाहन केले आहे. सदरची कामगिरी मा पोलीस अधीक्षक अंकित गोयल पुणे ग्रामीण,अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे पुणे विभाग, मा उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्रकुमार चौधर जुन्नर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,
पोसई अभिजीत सावंत, पोहवा दिपक साबळे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, विक्रम तापकीर, राजु मोमीण, अतुल डेरे, पोना संदिप वारे, पोकों अक्षय नवले, निलेश सुपेकर, व जुन्नर पोस्टे चे पोनि नारायण पवार, पोसई दिलीप पवार, पोकॉ सुनील शिंदे, विलास लेंभे यांनी केली आहे.