पिंपळगाव जोगा कालव्याला पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी; जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर

1 min read

बेल्हे दि.१२:- जुन्नर तालुक्याच्या पुर्व पट्यात पाऊस कमी नसल्याने आळे, राजुरी, बेल्हे, बांगरवाडी, उंचखडक, गुंजाळवाडी, रानमळा पट्टयात रोजी पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात आहेत.सोयाबीन पीक करपू लागले आहे.

ज्या थोड्या पावसावर शेतकर्यांनी पेरन्या केल्या ते पिक जळुन जाण्याच्या मार्गावर आहे. तसेच विहिरी, कूपनलिका, कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तरी पिंपळगाव जोगा कालव्याला पानी सोडन्यात यावे अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांची आहे. पाटबंधारे खात्याने याची दखल घेऊन त्वरीत पिंपळगाव जोगा कालव्याला पानी सोडावे अशी मागणी पांडू संगमनेरकर, जालींदर गायकवाड, शिवाजी डुंबरे, रानमळ्याचे सुरेश तिकोने या शेतकऱ्यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे