टॉमॅटो चे दर घसरले; कांद्याच्या दरात वाढ आळेफाटा उपबाजारात काल कांद्यास मिळाला तब्बल ‘इतका’ बाजारभाव
1 min read
आळेफाटा दि.१२:- नेपाळी टोमॅटो बाजारात आल्याने टोमॅटो चे दर काल घासरले परंतु कांद्याने किंचित उसळी घेतली आहे. आळेफाटा (ता.जुन्नर) येथील उपबाजारात शुक्रवार दि.११ रोजी कांद्याच्या २१ हजार ५९५ कांदा पिशवी ची आवक झाली असुन एक नंबर कांद्यास दहा किलोला २७५ रूपये बाजारभाव मिळाला आहे.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी झालेल्या नीलावात एक नंबर सुपर गोळा कांद्यास दहा किलोस २५० ते २७५ रूपये बाजार भाव मिळाला. तसेच गोळे कांदा १ नंबर २४० ते २५०, सुपर मेडियम दोन नंबर कांद्यास २१० ते २४० बाजारभाव मिळाला.
तर गोल्टी कांद्यास दहा किलोस १३० ते १९० रूपये बाजारभाव मिळाला तर बदला कांद्यास दहा किलोस ५० ते १५० रूपये बाजार भाव मिळाला.तर सिंगल पत्ती मेडीयम व मोठ्या कांद्यास १५० ते २०० रुपये बाजार मिळाला.