आळेफाटा उपबाजारात आज कांद्यास २५१ रूपये बाजारभाव

1 min read

आळेफाटा दि.१०:- आळेफाटा (ता.जुन्नर) येथील उपबाजारात गुरुवार दि.१० रोजी कांद्याच्या ९ हजार ५३३ कांदा पिशवी ची आवक झाली असुन एक नंबर कांद्यास दहा किलोला २५१ रूपये बाजारभाव मिळाला आहे.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी झालेल्या नीलावात एक नंबर सुपर गोळा कांद्यास दहा किलोस २४० ते २५१ रूपये बाजार भाव मिळाला. तसेच गोळे कांदा २२० ते २३०, सुपर एक नंबर कांद्यास २०० ते २२० बाजारभाव मिळाला‌‌.

दोन नंबर कांद्यास १६० ते २०० रूपये बाजारभाव मिळला. तर गोल्टी कांद्यास दहा किलोस १०० ते १७० रूपये बाजारभाव मिळाला तर बदला कांद्यास दहा किलोस ५० ते १५० रूपये बाजार भाव मिळाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे