बोरीच्या उच्चशिक्षीत तरुणाने मेंढी पालन व्यवसायातून तीन महिन्यात मिळवला लाखोंचा नफा
1 min read
बोरी दि.७:- बोरी बुद्रुक येथील उच्चशिक्षीत तरुणाने मेंढी व्यवसाय करून डबल नफा मिळवला आहे.बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) येथील युवराज सिताराम कोरडे या तरुणाने स्वताचे शिक्षण हे एम.बी.ए.ॲग्री असताणा देखील चांगली नोकरी सुध्दा त्यांना मिळाली होती परंतु पहिल्यापासुन शेती व व्यवसायाची आवड असल्याने शेती करत असताना त्याला जोडधंदा म्हणुन मेंढी पालनाचा व्यवसाय करण्याचा ठरवला.
आधी त्यांनी कोंबडी पालन व्यवसाय सुरू केला होता.त्या पेक्षा मेंढी पालणात जास्त उत्पादन मिळत असल्याने त्यांनी त्या शेडचा वापर मेंढी पालनासाठी केला. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर माडग्याळ या जातीच्या २५ मेंढ्या खरेदी केल्या व तीन महिने संभाळ करुन त्यांना यातून सर्व खर्च जाऊन भांडवलाच्या डबल नफा मिळवला.
सध्या दुसऱ्या लॉट मधे त्यांनी ४० मेंढ्या पाळल्या असुन यांचे संगोपन करत आहेत. या गोठ्याची स्वच्छता ठेवणे खुप गरजेचे असून वेळोवेळी जंतनाशक व लसीकरण करणे ही तितकेच महत्वाचे असते. त्यामुळे मेंढ्यांणा कोणत्याही प्रकारचा आजार पसरत नाही. तसेच यांना खाद्य म्हणुन घास, गवत मका तर तुरीचे भुसा, शेंगदाणा पेंड, कांडी पेंड दिले जाते. या मेंढ्यांची चांगली जोपासना केल्याने तिन ते चार महिन्यात सांभाळुन ३०-४० किलो वजनाच्या मेंढ्या मार्केट मध्ये रोख स्वरुपात विक्री केली जाते.
विक्री करण्यासाठी जागेवर व्यापारी ग्राहक येतात.किंवा चाकण येथील बाजारपेठत मेंढ्यांची विक्री केली जाते.माडग्याळ जातीच्या मेंढ्या बाजारात कायमचं चढ्या दराने विक्री होत असते. या जातीच्या मेंढ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीच्या मेंढ्या या दख्खनी मेंढ्यांपेक्षा उंच असतात. या जातीची मेंढी ही प्रामुख्याने लांब असते. तर या मेंढ्यांच्या शरीराची वाढ चांगली राहते.
बरेचसे मेंढपाळ या जातीच्या नराचा वापर आपल्या कळपात पैदाशीसाठी करत असतात नराचे वजन सर्वसाधारणपणे ४० ते ५० किलो दरम्यान असते. तसेच या जातीच्या मादीचे वजन ३५ ते ४० किलो इतके असुन एका मेंढीची तिनं महिन्यानंतर १० हजार रुपयापर्यत विक्री होत आहे. तसेच सध्याच्या काळात सेंद्रिय खतांमध्ये शेळी व मेंढी च्या लेंडी खताची मागणी येऊ लागली आहे.
प्रति ट्रोली रू ५-६ हजार दराने विक्री केली जाते. त्यातुनही चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.खताच्या विक्रीतून मेंढ्यांच्या चाऱ्याचा व खुरकाचा अर्धा खर्च मिळतो. आजपर्यंत मेंढी पालन व्यवसाय हा पारंपारिक पध्दतीने करताणा अनेक वेळा पाहिले असेल. नगर जिल्ह्यातील मेंढपाळ हे आपल्या तालुक्यात येऊन मेंढया घेऊन दररोज गावोगावी फिरताणा दिसुन येत असतात.
हाच व्यवसाय आपण आधुनिक पध्दतीने केला तर आपल्याला याचा फायदा लक्षात येईल.विशेष म्हणजे यासाठी कोरडे कुटुंबियांना कोणतेही शासकीय अनुदान घेतले नाही.
“ शेळी पालना पेक्षा मेंढी पालन फायदेशीर आहे. २० मेंढ्या च्या उत्पादनातून ४ महिन्यात खर्च जाता ७५ हजार ते १ लाख रुपये नफा मिळाला. सद्या ४० मेंढ्या असून पुढच्या लॉट ला सव्वा ते दीड लाख पेक्षा जास्त नफा होईल.सुशिक्षित बेरोजगारांसाठी हा चांगला व्यवसाय असून तरुणांनी या व्यवसायात उतरले पाहिजे.”
युवराज कोरडे
मेंढीपालन उत्पादक तरुण व्यावसायिक, बोरी