मकरंद पाटे यांची मनसे जिल्हा अध्यक्ष पदी निवड; उमेदवारी मिळाल्यास विधानसभा लढणार: मकरंद पाटे

1 min read

नारायणगाव दि.१०:-मकरंद पाटे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाली असून नुकतेच त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. शालेय जीवनापासून राज ठाकरे यांच्या सोबत काम केले. 2000 साली 12 वीत कॉलेजला विद्यार्थी प्रतिनिधी असताना भारतीय विद्यार्थी सेनेची जुन्नर तालुका विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली. नंतर 2003 साली बाळासाहेब दांगट आमदार असताना जुन्नर तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी. नंतर 2005 साली राज ठाकरे यांच्या सोबत बाहेर पडून 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाले पासून आज पर्यन्त जिल्हा उपाध्यक्ष ही जबाबदारी दिली. या कालावधीत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी रस्तावर उतरून आंदोलने केली अनेक गुन्हे दाखल झाले. आज अनपेक्षित पणे कोणतीही कल्पना नसताना व माझी कोणतीही मागणी नसताना राजसाहेबांनी जिल्हाअध्यक्ष ही जबाबदारी दिली. असो कोणतेही पद म्हणजे शोभेची वस्तू नसते तर ती एक जबाबदारी असते.

निश्चित पणे सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रत्येकाच्या सूचना विचारात घेऊन पक्ष वाढवणे साठी तसेच सर्वसामान्य माणूस केंद्र बिंदू मानून त्यांचे प्रश्न सोडविणे वर भर दिला जाईल. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी हा विश्वास माझ्यावर टाकला त्याबद्दल त्यांचे व वरिष्ठ पदाधिकारी यांचे आभार मी सर्वांचा ऋणी आहे. असे मकरंद पाटे म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे