विजय कुऱ्हाडे यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती

1 min read

आळेफाटा दि.५:- आळे (ता.जुन्नर) गावचे उपसरपंच विजय कुऱ्हाडे यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाली आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने कुऱ्हाडे यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात भरीव कार्य करण्याचे व पक्ष संघटना मजबुतीने उभी करण्याची अपेक्षा पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.सदर नियुक्ती पत्र आज शनिवार दि.५ रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांनी नियुक्तीपत्र दिले. कुऱ्हाडे यांची नियुक्ती झाल्याने त्यांचं तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे