बेल्हे -जेजुरी महामार्गाच्या रस्त्याचे श्रेय लाटण्यासाठी दुस-यांदा भुमीपुजन होऊ देणार नाही:- माजी आमदार शरद सोनवणे
1 min readबेल्हे दि.३:- बेल्हा-जेजुरी महामार्गाच्या रस्त्याचे श्रेय लाटण्यासाठी दुस-यांदा भुमीपुजन कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा माजी आमदार शरद सोनवणे यांनी बेल्हे (ता.जुन्नर) येथे दिला.
येथे बेल्हे ते जेजुरी या महामार्गाचे दुस-यांदा भुमीपुजन खासदार डॉ.अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते शनिवार (दि.५) रोजी होणार आहे.त्या निमित्ताने शरद सोनवणे यांनी तातडीची पत्रकार परिषद येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित केली होती.
यावेळी शरद सोनवणे म्हणाले की मी हॅम च्या माध्यमातून या रस्त्यासाठी निधी मंजूर घेतला आहे. या रस्त्याचे भुमीपुजन या पूर्वीच शरद सोनवणे यांच्या हस्ते झाले आहे. मग हे दुस-यांदा भुमीपुजन करण्याचा घाट कशासाठी केला जात आहे. कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याचा मुखवटा फाडला पाहिजे.
कोणाचेही अतिक्रमण न तोडता हा रस्ता ७ मीटर होण्यास हरकत नाही. तसेच या कामाचा विद्यमान आमदारांचा काहीही संबंध नाही. दुस-यांदा भुमीपुजन करणे म्हणजे लोकांच्या डोक्यात धूळफेक आहे. आपला पराक्रम आपण नवीन पोजेक्ट आणुन दाखवा व स्वतःची पाटी लावा. खोट्या पध्दतीने उद्घाटन करु नका.
शनिवारी तालुक्यातील मी व सर्व कार्यकर्ते या ठिकाणी बोलवणार असुन काळ्या फिती लावुन याचा निषेध करणार आहे. तिथे काय घडेल त्याला तेच जबाबदार राहतील. यावेळी माजी उपसरपंच निलेश कणसे, प्रदीप पिंगट, मोहन मटाले, मोहन बांगर, बबन औटी, विजय घोडके, राजु गफले, कैलास औटी, मनोहर पिंगट, ठकाजी शिंदे, शंकर शिंदे, दत्ता खोमणे आदी उपस्थित होते.