शिवसेना उपतालुका प्रमुख पदी सचीन निघोट यांची निवड
1 min read
मंचर दि.३:- निघोटवाडी (ता.आंबेगाव) येथील शिवसेनेचे मा. शाखाप्रमुख, सोसायटी संचालक,ग्रा.पं.सरपंच पदाच्या निवडणुकीत निसटता पराभव स्वीकारावा लागलेले सचीन प्रकाश निघोट यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपतालुका प्रमुखपदी निवड झाली. उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वांना बरोबर घेऊन शिवसैनिकांच्या सल्ल्याने गाव तालुका पातळीवर विविध कामे, समस्यांवर मार्ग काढण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.प्रगतीशील शेतकरी आणि यशस्वी उद्योजक अशीही त्यांची ओळख असुन विविध मंडळांवर पदाधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत, ते सामाजिक, निघोटवाडी गावच्या कामात नेहमी अग्रेसर असुन सर्वांना बरोबर घेऊन चालत असतात.
अशा एका सच्चा शिवसैनिक, कार्यकर्त्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ऊपतालुका प्रमुख पदावर निवड केल्याने गेली ३० / ३५ वर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून नावाजलेल्या निघोटवाडीतील शिवसैनिक ग्रामस्थांमध्ये आनंद व समाधानाने वातावरण निर्माण झाले आहे.
शिवसेना शाखा निघोटवाडी येथील शिवसैनिकांनी सचीन निघोट यांची ऊपतालुका प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला व फटाके वाजवून आनंद साजरा केला.