आमदार महेश लांडगे यांनी अधिवेशनात आक्रमक होऊन अबू आझमींना सुनावले

1 min read

मुंबई दि.३:- भोसरीचे आमदार महेश लांडगे हे पैलवान गडी त्यात मैदानी खेळांची आवड जोपासत ते सध्या राजकीय आखाडाही गाजवत आहे. राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान आज (बुधवारी) आक्रमक चर्चा होताना दिसली, यावेळी संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन कारवाई बाबत सभागृहात चर्चा सुरू होती. त्यावेळी शाब्दिक खडाजंगी झाली. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सपाचे नेते अबु आझमी यांच्यावर हल्ला चढविला. तुम्ही जर शिवाजी महाराजांना मानता तर मग औरंगजेबाचा लळा का लावता?’ असा प्रश्न आ. लांडगे यांनी अबू आझमी यांना केला. याबाबतचा व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने अनेकांच्या व्हॉटसअप स्टेटसला ठेवण्यात आला.

मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशन आ. लांडगे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे चांगलीची चर्चा होत आहे. आजच्या या घटनेवरुन असाच २००९ सालचा किस्सा आठवतो तो म्हणजे हिंदीत शपथ घेतल्यामुळे सपा नेते अबू आझमी यांना मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांनी चापट मारली होती. त्या काळात राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष उभारी घेत होता. त्यावेळी मनसेचे १३ आमदार यामध्ये निवडून आले होते. मुंबई मध्ये ही संख्या सेनेच्या वरचढ होती.निवडून आलेल्या सर्व आमदारांनी विधानसभेत मराठीत शपथ घ्यावी, असं राज ठाकरेंनी जाहीर आवाहन केलं होतं. याला आवाहनाला जर विरोध केला मनसे स्टाईल उत्तर देण्यात येईल, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं. अबू आझमी शपथ घेण्यासाठी उभे राहिले, त्यांनी हिंदीमध्ये शपथ घेण्यास सुरुवात केली. हे पाहिल्यानंतर मनसे आमदार आक्रमक झाले होते. हे प्रकरण खूपच पेटल होत. आज अबू आझमी यांना आमदार महेश लांडगे यांनी सडेतोड बोलले जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानता तर औरंगजेबाचा लळा का लावता? मुख्यमंत्र्यांनी याबाबत कठोर कारवाई करावी अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली. यावेळी लांडगे यांची आक्रमकता दिसून आल्याने पुणे जिल्ह्यात चर्चा होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे