विद्यार्थ्यांना एमबीए २०२३ च्या प्रवेशासाठी अखेरची संधी मॅट परीक्षा चे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ ऑगस्ट

1 min read

बेल्हे दि.३:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट, बेल्हे (ता.जुन्नर) या व्यवस्थापन शास्त्र (एम बी ए) महाविद्यालयामध्ये समुपदेशन केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म भरणे, प्रवेशासाठी व शिष्यवृत्तीसाठी लागणारी विविध कागदपत्रे त्याचप्रमाणे विविध अभ्यासक्रम याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाते.

शैक्षणिक वर्ष २०२३ मध्ये नुकतेच पदवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी,ज्यांनी महा-एमबीए एमएमएस-सीईटी-२०२३ व इतर कोणतीही परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी अखेरची संधी म्हणून ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन तर्फे “मॅनेजमेंट एप्टीट्यूड टेस्ट” म्हणजेच “मॅट परीक्षा २०२३” आयोजित करण्यात आल्याची माहिती प्राचार्य राजीव सावंत यांनी दिली.


सदरची परीक्षा ही रविवार दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी घेण्यात येणार असून त्यासाठी विद्यार्थी गुरुवार दि.१७ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करू शकतो.त्यानंतर २५ ऑगस्ट रोजी निकाल जाहिर होईल.हि परीक्षा ऑनलाइन स्वरूपाची असणार आहे.


आणि हि परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षामध्ये एम बी ए मध्ये रिक्त जागांवर प्रवेश निश्चित करण्याची संधी मिळणार आहे. सदर परीक्षेची माहिती विद्यार्थ्यांना http://mat.aima.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.


तरी एम बी ए या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी विहित मुदतीतच ऑनलाईन अर्ज भरावेत असे प्रा.राजीव सावंत यांनी सांगितले आहे.एम बी ए प्रवेशप्रक्रिया व अधिकच्या माहितीसाठी डॉ.महेश भास्कर-९७६६११७८७१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे