दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

1 min read

निमगाव सावा दि.१:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. छाया जाधव यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे अजरामर आहे. त्यांच्या साहित्यातून तरुणांना संघर्षाची प्रेरणा मिळते. लोकमान्य टिळक यांनी तर “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” अशी घोषणा केली. जहाल मतवादी विचारातून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. आपल्या लेखणीतून सामान्यांमध्ये संघर्षाचे बीजारोपण केले आणि ब्रिटिशांच्या जुलमी राजवट व अन्यायाविरुद्ध वाचा फोडली.असे मत मांडले. प्रा. राहुल सरोदे यांनी आपल्या मनोगतामध्ये लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणादायी कार्याचा उल्लेख केला. याप्रसंगी संस्थेचे सचिव परेश घोडे, संस्था प्रतिनिधी कविता पवार, प्रा.अनिल पडवळ, प्रा.सुभाष घोडे, प्रा. प्रवीण गोरडे प्रा. ज्योती गायकवाड, प्रा. पूनम पाटे, प्रा.माधुरी भोर. प्रा.प्रियंका डुकरे प्रा. शिवाजी साळवे महाविद्यालयातील प्राध्यापकेतर् कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीलम गायकवाड, प्रास्ताविक प्रा.प्रल्हाद शिंदे यांनी केले व प्रा.नितीन मोजाड यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे