मातोश्री ग्लोबल स्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
1 min readकर्जुले हर्या दि.१:- लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या १०३ वी पुण्यतिथी निमित्त मातोश्री ग्लोबल स्कूल व ज्युनियर कॉलेज कर्जुले हर्या (ता.पारनेर) येथे सर्वप्रथम लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस शाळेच्या प्राचार्या शितल आहेर यांनी पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तदनंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांच्या बालपणातील आठवणी तसेच त्यांचे स्वातंत्र्याच्या लढ्यातील अमूल्य असे सहकार्य व त्याग याबद्दल हर्षल खामकर, यश डोळस, वेद गागरे, ओवी बर्वे, पायल रोकडे, कल्पिता छाजेड, व दिक्षा डुकरे आपल्या भाषणात सविस्तर माहिती दिली. तर शाळेच्या प्राचार्या शितल किरण आहेर यांनी बाळ गंगाधर टिळकांच्या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य सेनानी व स्वातंत्र्य चळवळीचे प्रथम योद्धे होते असे सांगितले. बाळ गंगाधर टिळकांनी भारतभर ब्रिटिशांच्या विरुद्ध लोक जागृती करून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. तेंव्हा त्यांना राजद्रोहा खाली सहा वर्ष तुरुंगवास झाला. तुरुंगवासात असताना त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. ते जहाल मतवादी होते. त्यांनी स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना केली. गणेश उत्सव व शिवजयंती सारखे कार्यक्रम त्यांनी सुरू केले व त्या माध्यमातून ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्याची चळवळ सुरू ठेवली. त्यांनी आपल्या मराठा व केसरी या वर्तमानपत्रातून देखील लोकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल, राष्ट्राबद्दल प्रेम व स्वातंत्र्य मिळवण्याकरिता त्यागाची भावना निर्माण होईल याकरिता अनेक लेख लिहिले. अशा या महान क्रांतिकारी देशभक्तास प्राचार्य शितल आहेर यांनी मनःपूर्वक अभिवादन केले व विद्यार्थ्यांनी निर्भीडपणे आपल्या जीवनात टिळकां सारखी खंबीर भूमिका अवलंबून आपणास मिळालेले स्वातंत्र्य व लोकशाही अबाधित राखण्यासाठी जागृत असावे असा सल्लाही शेवटी दिला.
या कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा मिराताई आहेर, विश्वस्त डॉ. दिपक आहेर, सेक्रेटरी किरण आहेर, कार्यालयीन अधीक्षक यशवंत फापाळे, शाळेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश व्यास, शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रानी रासकर व आभार प्रतिमा पवार यांनी केले.