समर्थ इन्स्टिट्युट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस च्या शैक्षणिक कामगिरी साठी ‘एक्सलंट ग्रेड’
1 min read
बेल्हे दि.३१:- महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत नुकत्याच करण्यात आलेल्या अ्वेक्षण अहवाला नुसार समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस बेल्हे (ता.जुन्नर) या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी शैक्षणिक कामगिरी साठी एक्सलंट ग्रेड देण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली.
समर्थ रूरल एजुकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल,बेल्हे येथे पॅरामेडिकल सायन्स चा हा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारीत असलेला व्यवसायाभिमुख पदवीचा अभ्यासक्रम आहे.ए डी एम एल टी म्हणजेच ऍडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रम समर्थ संकुलामध्ये सुरु झालेला आहे.
सदर अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यता प्राप्त उत्तर पुणे जिल्ह्यातील एकमेव अभ्यासक्रम आहे.एक वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्याला बोर्डाच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेला सामोरे जावे लागते.त्यानंतर सहा महिने हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करणे गरजेचे असते.
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रक्त,लघवी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी नोंदणीकृत परवाना प्राप्त होतो.फार्मास्यूटिकल्स कंपन्यांमध्ये नोकरीच्या अनेकविध संधी उपलब्ध आहेत.
महाविद्यालयातील पायाभूत सुविधा,शैक्षणिक उपक्रम,गुणवत्तापूर्ण शिक्षण,अध्ययावत प्रयोगशाळा व उपकरणे,संगणक लॅब,वर्गखोल्या,सेमिनार हॉल इ.या सर्व बाबींची तपासणी करून महाविद्यालयातील शैक्षणिक कामगिरीचा दर्जा “एक्सलंट” दिल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके व विश्वस्त वल्लभ शेळके यांनी समर्थ इन्स्टिट्युट ऑफ पॅरा मेडिकल सायन्सेस चे प्राचार्य, समन्वयक शुभम पाटे व सहकारी शिक्षकांचे अभिनंदन केले.