समर्थ फार्मसी च्या चंद्रभागा गायकवाड चे नायपर मध्ये यश
1 min read
बेल्हे दि.२९:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे (बांगरवाडी) या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील चंद्रभागा गायकवाड हिने “नायपर जेईई २०२३” परीक्षेत प्राविण्य मिळवल्याची माहिती प्राचार्य डॉ.संतोष घुले यांनी दिली.फार्मसी विद्याशाखेच्या राष्ट्रीय स्तरावरील शासकीय संस्थांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी द्यावी लागणारी नायपर जेईई (NIPER Joint Entrance Exam, NIPER JEE) ही परीक्षा देशभरात दरवर्षी घेतली जाते.या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
त्यामध्ये समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी मधील चंद्रभागा गायकवाड हिने ऑल इंडिया रँक-३१३६ प्राप्त केला.नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रीसर्च (National Institute of Pharmaceutical Education and Research) या संस्थेच्या हैदराबाद शाखेमार्फत या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
हैदराबाद प्रमाणेच मोहाली, रायबरेली, कोलकाता, अहमदाबाद, हाजीपूर,गुवाहाटी या ठिकाणी भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या फार्मास्युटिकल्स विभागाच्या अधिपत्याखाली नायपर संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत.
यावर्षी समर्थ इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी या दोन्ही महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएट फार्मसी एप्टिट्यूड टेस्ट (जी-पॅट-२०२३) या राष्ट्रीय परीक्षेत यश संपादन केलेले आहे.
जी-पॅट (G-PAT) या एनटीएमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते व त्यांना भारत सरकारकडून दरमहा १२ हजार ५०० रु.एवढी रक्कम स्टायपेंड म्हणून दिली जाते अशी माहिती प्राचार्य डॉ.संतोष घुले यांनी दिली.फार्मसीमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी जसे की,एम.फार्म,एम एस,एम टेक (फार्म),एम बी ए(फार्म) पी एच डी आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नायपर ही संयुक्त प्रवेश परीक्षा घेतली जाते.
चंद्रभागा गायकवाड हिने नायपर परीक्षेचा अभ्यास ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून विविध प्रकारचे वेबिनार,सेमिनार च्या साहाय्याने केला.समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले तसेच समर्थ इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की,विभागप्रमुख प्रा.सचिन दातखिळे,डॉ.बिपीन गांधी,डॉ.कुलदिप वैद्य तसेच सर्व शिक्षकांनी तिला मार्गदर्शन केले.
चंद्रभागाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत यांनी विशेष अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.