वाढदिवसाचा खर्च टाळून औरंगपूर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

1 min read

औरंगपूर दि.२२:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा औरंगपूर या शाळेत आज औरंगपूर (ता.जुन्नर) गावातील दातृत्व संपन्न व्यक्तिमत्व अनिकेत लहू डुकरे व अविनाश लहू डुकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊच वाटप करण्यात आले.याप्रसंगी रामदास कामठे, बबन महाराज डुकरे , अर्जुन उंडे, बबन नाना डुकरे इत्यादी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत शाळेबद्दल सामजिक बांधिलकी जपत दाखवलेल्या दातृत्वाबद्दल शाळेतील विद्यार्थ्याला केलेल्या शैक्षणिक साहित्य वाटपाचे कौतुक करत दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच शाळेमध्ये चालू असलेल्या विकास कामाबाबत मुलांच्या गुणवत्तेबाबत कौतुक केले. परिसरातील अनेक लोक शाळा पाहण्यासाठी येतात कौतुक करतात याबद्दल शाळेतील शिक्षकांचेही कौतुक केले.शाळेची व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब कामठे यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेमध्ये केलेल्या सुधारणा यामध्ये ग्रामस्थांचे व जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांचे असणारे योगदान याविषयी माहिती देत उभयतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी सरपंच माया कामठे शा. व्यवस्था पन सदस्य अर्जुन मुंडे, नितेश काटे, नानाभाऊ पवार मा.चेअरमन अशोक बबनराव डुकरे ,मा.सरपंच सिताराम पाटील डुकरे, पंढरीनाथ भाऊसाहेब डुकरे, बाळशिराम भिवाजी डुकरे, शांताराम डुकरे, गणपत भिवाजी डुकरे, कैलास बाबुराव डुकरे, भरत थिटे, गुलाब कामठे, ठकसेन वाजे , गुलाब रोकडे, दत्तात्रय डुकरे , दत्तू राजाराम डुकरे, फुलभाऊ डुकरे सुनील डुकरे, राजाराम डुकरे , किसन डुकरे ,राजू कामटे , सागर डुकरे , इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते .
वाढदिवसाच्या निमित्त शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवसा दिवस संस्मरणीय करण्याचं काम या दोघांनी केले,शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत साळवे यांनी या कुटुंबीयांचा सन्मान केला. उपशिक्षक संतोष डुकरे व विद्या जावळे यांनी कार्यक्रमचे नियोजन केले. उपशिक्षक शंकर डुकरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि यापुढील काळात अशाच प्रकारचे सहकार्य शाळेला करण्याची करण्याचे आव्हान या प्रसंगी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे