नगर जिल्ह्यात प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज डाैलाने फडकणार

1 min read

नगर दि.३:- देश भावना जागृत हाेऊन देशासाठी बलिदान दिलेल्यांचे स्मरण व्हावे, यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या १३ ते १५ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज डौलाने फडकावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलताना म्हणाले, ”सध्या स्वातंत्र्याचा अमृत महाेत्सव माेठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. प्रत्येकाच्या घरावर तिरंगा ध्वज लावण्यासाठी पाेस्ट कार्यालयामध्ये सशुल्क ध्वज उपलब्ध हाेणार आहे. तसेच पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरण सजावट यासाठी गणेशाेत्सवात गणेश मंडळांसाठी शासनाकडून स्पर्धा आयाेजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी लाखोंची बक्षिसे असणार आहे. सोबतच नगर जिल्ह्यात माेठ्या प्रमाणावर मतदार नाेंदणी अभियान सुरू आहे. जास्तीत-जास्त मतदारांनी नाव नाेंदणी करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे