जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने आजपासून महारक्तदान शिबिर
1 min read
आळेफाटा दि.५:- क्रांती दिनाच्या निमित्ताने स्वतंत्रता लढ्यातील हतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी ‘जगदंब प्रतिष्ठान’च्या वतीने आज दि. ५ ते १३ ऑगस्ट दरम्यान महारक्तदान यज्ञ आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना सहा लाख रुपयांचे अपघाती विमा कवच दिले जाणार आहे.या महारक्तदान यज्ञात सहभागी होणाऱ्या रक्तदात्याला ३ लाख रुपयांचा अपघात विमा ३ लाखांचा जीवन विमा, असे एकूण ६ लाखांचे विमा कवच दिले जाणार आहे. त्याचबरोबर रक्तदात्यास आजीवन मोफत रक्त आणि नातेवाईकास एक वर्ष मोफत रक्त मिळणार आहे.गरजूंना जीवदान देण्यासाठी या शिबिरात महाविद्यालयीन युवक, युवती व तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.