जगदंब प्रतिष्ठान च्या महारक्तदान शिबिरात आळे कॉलेज मध्ये ८४ दात्यांनी केले रक्तदान

1 min read

आळेफाटा दि.५:- शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतुन‌ जगदंब प्रतिष्ठान व आळे (ता.जुन्नर) येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ संचलित बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य , विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना ,राष्ट्रीय सेवा योजना ,विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एनसीसी चे कॅडेट्स, ग्रामस्थ यांसह एकुण ८४ जणांनी रक्तदान केले.या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अजय कु-हाडे ,उपाध्यक्ष सौरभ डोके, सचिव अर्जुन पाडेकर, खजिनदार अरुण हुलवळे, संचालक बाळासाहेब जाधव,संस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक भाऊ कु-हाडे, किशोर कु-हाडे, बबन सहाणे, उल्हास सहाणे बाबू कु-हाडे, शिवाजी गुंजाळ, जीवन शिंदे, दिनेश सहाणे, कैलास शेळके, प्रदीप गुंजाळ, देविदास पाडेकर. सम्राट कु-हाडे, रमेश कु-हाडे, शांताराम कु-हाडे तसेच विशाल जुन्नर सेवा मंडळाच्या डी फार्मसी कॉलेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी.गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.या शिबीराचे नियोजन प्रा.डॉ.प्रविण जाधव, प्रा.संजय वाकचौरे,  कॅप्टन डॉ. रावसाहेब गरड, कॅप्टन डॉ. सुषमा कदम, डॉ. जयसिंग गाडेकर, डॉ. मनीषा गिरी,  प्रा.विकास पुंडे , प्रा. संतोष राठोड, प्रा. नुतन जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे