कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी प्रकाश पाटील भुजबळ यांच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन
1 min readआळेफाटा दि.६:- आळे (ता.जुन्नर) येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील भुजबळ यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन ओबीसी नेते व राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांणी आज रविवार (दि. ६) रोजी भेट देऊन केले. यावेळी माजी राज्यमंत्री बापुसाहेब भुजबळ, जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस, मोहन पाटील भुजबळ, प्रसन्न डोके. निलेश भुजबळ, डॉ.जिवन भुजबळ, उदय पाटील भुजबळ, शांताराम डोके, गणेश शिंदे, रुपेश भुजबळ, सुभाष वाघोले, संतोष पाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री भुजबळ यांनी प्रकाश पाटील हे नेहमी सामाजिक कामात अग्रेसर होते असे सांगीतले व श्रद्धांजली वाहिली.