भारतीय बौध्द महासभा जुन्नर तालुक्याच्या वतीने जुन्नर तालुका स्तरीय चिंतन शिबिर संपन्न

1 min read

बेल्हे दि.१:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा पुणे जिल्हा पश्चिम अंतर्गत शाखा जुन्नर तालुक्याच्या वतीने तालुका स्तरीय चिंतन शिबिर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह चौक बेल्हे (ता.जुन्नर) या ठिकाणी संपन्न झाले. भारतीय बौध्द महासभा पुणे जिल्हा पश्चिम कोषाध्यक्ष आयु.राजेंद्रभोसले, संस्कार उपाध्यक्ष आयु.अशोक कडलक यांनी संस्थेने ठरवून दिलेल्या विषयावर प्रभावीपणे मार्गदर्शन केले.चिंतन शिबिर दोन सत्रात घेण्यात आले.दुसऱ्या सत्रात वर्षावास प्रवचन मालिका प्रवचन पुष्प पाचवे बौद्धांचे सण,मंगल दिन, स्मृतिदिन या विषयावर आयु. अशोक कडलक गुरुजी यांनी प्रवचन दिले. जुन्नर तालुका संस्कार सचिव आयु.नि. पुनम दुधवडे, कार्यालयीन सचिव प्राचार्य अजित अभंग सर यांनी मनोगत व्यक्त केले.हे शिबिर भारतीय बौध्द महासभा जुन्नर तालुका अध्यक्ष आयु.राकेश सुदाम डोळस यांच्या अध्यक्षते खाली पार पडले. जुन्नर तालुका अध्यक्ष आयु.राकेश डोळस गुरुजी यांनी अध्यक्षीय मनोगत केले.चिंतन शिबिरासाठी जुन्नर तालुका कार्यकारणी व मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन-सरचिटणीसआयु.संजय धोत्रे सर यांनी केले. उपस्थितांचे स्वागत- संस्कार उपाध्यक्ष आयु.नितिन साळवे केले.तर जुन्नर तालुका कोषाध्यक्ष आयु.चंद्रकांत जावळे गुरुजी यांनी उपस्थितांचे आभार वक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे