समर्थ बीबीए महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल

1 min read

बेल्हे दि.१७:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स बेल्हे अंतर्गत बीबीए(आय बी) या महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्य डॉ.उत्तम शेलार यांनी दिली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अंतर्गत बीबीए हा अभ्यासक्रम सुरू आहे.सदर अभ्यासक्रमाला एकूण ६८ विद्यार्थी प्रवेशित झालेले होते.त्यापैकी सर्वच ६८ विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमा व्यतिरिक्त शैक्षणिक व इतर उपक्रम महाविद्यालय सतत राबवत असते.जर्मन भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम,टॅली सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर बेस्ड अकाऊंटिंग,औद्योगिक भेटी.तज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने,कार्यशाळा,करियर मार्गदर्शन कार्यक्रम या सर्व उपक्रमांचा परिपाक व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष देऊन प्रयत्नशील असलेला शिक्षकवर्ग यामुळेच समर्थ बी बी ए (इंटरनॅशनल बिझनेस) या महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल लागलेला आहे.गुणात्मक दर्जा वाढवण्यासाठी वेळोवेळी आयोजित करण्यात येणारे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम,अतिरिक्त वर्ग,प्रशिक्षण कार्यक्रम इ च्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना नेहमी अपडेट ठेवण्याचा प्रयत्न संस्था करत असल्याचे डॉ. लक्ष्मण घोलप यांनी सांगितले.प्रथम वर्ष बीबीए(आय बी) निकाल पुढीलप्रमाणे: प्रथम क्र.-आयेशा पठाण, अनुजा गुंजाळ, पायल भोसले,साक्षी कडूसकर,सेजल वाघ,मानसी येवले, -८५.१६%द्वितीय क्र.-दिशा भोर, सुयश डुंबरे,विघ्नेश कणसे,गौरव शेळके,पायल येवले-८३.६०%,तृतीय क्र.-ऋतुजा घोडे, रितेश गुंजाळ,साक्षी डुकरे,ज्योती येवले-८१.६०%,चतुर्थ क्र.-श्रद्धा चौगुले,चित्रा निचित-७९.३३%,पाचवा क्र.-हर्ष औटी,दिशा औटी, अपेक्षा कुंजीर, स्नेहा कणसे -७८.२६% सर्व यशस्वी विद्यार्थी, विभागप्रमुख प्रा.गणेश बोरचटे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे