शिष्यवृत्ती परीक्षेत श्री बेल्हेश्वर विद्यामंदिराचे नेत्रदीपक यश; 20 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले
1 min read
बेल्हे दि.१६:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर, बेल्हे, ता. जुन्नर, जि. पुणे चे २० विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक व रयत शिक्षण संस्थेचे समन्वय समिती सदस्य अजित अभंग यांनी दिली.प्रणव यादव (236 गुण) प्रगती पिंगट (236 गुण) ऋतुजा बनकर ( 236 गुण) आरती पिंगट ( 230 गुण) करण बांगर (230 गुण) पूजन गुंजाळ (224 गुण) सागरीका मटाले (224 गुण) जयदीप बांगर (222 गुण) जीवन बांगर (218 गुण) अनुष्का गाडगे (212 गुण) ईश्वरी खराडे (210 गुण) अरीबा इनामदार (208 गुण) साई गाडगे (204 गुण) आर्यन गुंजाळ (198 गुण) श्रुतिका आवारी (198 गुण) दिव्या बांगर (196 गुण) ओंकार मटाले (194 गुण) समर्थ विश्वासराव (192 गुण) सार्थकी सोनवणे (182 गुण) कल्पेश पिंगट (236 गुण) हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख विकास गोसावी, अश्विनी गेंगजे व मार्गदर्शक शिक्षक नितीन मुळूक, चंद्रकांत हगवणे, जयराम मटाले, जयश्री फापाळे, अमोल गेंगजे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय अधिकारी के.डी. रत्नपारखी व सहायक विभागीय अधिकारी एस.टी. पवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, ग्रामस्थ व पालक वर्गातून विद्यार्थ्यांच्या या यशाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.