विद्या विकास मंदिर चे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकले
1 min read
राजुरी दि.१५:- विद्या विकास मंदिर राजुरी (ता.जुन्नर) चे ५ वी व ८ वी चे विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत चमकले असून पाचवी चे २ विद्यार्थी तर आठवीचे ५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून स्कॉलरशिप साठी पात्र ठरले आहेत.पाचवीतून इथापे स्वरा प्रकाश (जिल्हा गुणवत्ता यादीत 99 वी), कुटे रुद्र राहुल (जिल्हा गुणवत्ता यादीत 321 वा)तर आठवी तून आहेर पराग संजय (जिल्हा गुणवत्ता यादीत 58 वा), पवार आर्या सुनिल (जिल्हा गुणवत्ता यादीत 214 वी), हाडवळे चैतन्या मंगेश (जिल्हा गुणवत्ता यादीत 324 वी), चौगुले अंजुम अशपाक (तालुका गुणवत्ता यादीत 1 वी).
हाडवळे पार्थ संदीप (तालुका गुणवत्ता यादीत 6 वा) या विद्यार्थ्यांना अंगद उदमले,राजेंद्र गाडेकर, संभाजी हाडवळे, अर्चना शहाणे, किरण औटी, रुपाली डुंबरे, सुधीर भागवत, मंगेश डुंबरे या शिक्षकांनी मार्गदर्शक मार्गदर्शन केले.