अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका रोहिणी मदने – मेहेर यांना पीएच. डी प्रदान

1 min read

ओतूर दि.१४:- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या ओतूर (ता.जुन्नर) येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाच्या मराठी विभागातील सहाय्यक प्राध्यापिका रोहिणी मदने – मेहेर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे यांची मराठी विषयातील सर्वोच्च Ph.D (विद्यावाचस्पती) ही पदवी प्रदान करण्यात आली. संशोधक मार्गदर्शक बी.डी.काळे महाविद्यालय,घोडेगावचे प्रभारी प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर हे होते.बहिस्थ परीक्षक म्हणून डॉ.वासुदेव वले (पाचोरा,जि. जळगाव) हे उपस्थित होते. त्यांचा पीएच.डी साठी विषय मराठवाडयातील ग्रामीण लेखक “बाबू बिरादार यांचे कादंबरी लेखन : स्वरूप आणि चिकित्सा” हा होता. त्यांच्या या यशाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा राजेंद्र घाडगे , मानसचिव संदीप कदम, व इतर सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ.तुकाराम रोंगटे, डॉ.प्रभाकर देसाई,डॉ.वासुदेव वले,मार्गदर्शक डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर,मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.संदीप सांगळे, वाघीरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे, मराठी विभागप्रमुख डॉ.वसंत गावडे, डॉ. राजाभाऊ भैलुमे, प्राचार्य डॉ.संजय नगरकर, डॉ.राजेंद्र थोरात, प्रा. पांडुरंग पुठ्ठेवाड (नांदेड), प्रा.सुनिता ‌म्हस्कुले, पति गणेश मेहेर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे