जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव आनंदच्या विद्यार्थ्यांचे प्रतीकात्मक पायीवारी दिंडी सोहळ्याचे आयोजन

1 min read

आळेफाटा दि.१४:-पुणे जिल्ह्यातील शालेय शिक्षण व इतर शालेय कलाकृर्ती यामध्ये अग्रगण्य असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव आनंदच्या विद्यार्थ्यांच्या वतीने प्रतिकात्मक पायीवारी दिंडी सोहळा याचे आयोजन गुरुवार दि .१३ जुलै रोजी आलेल्या कामिका एकादशीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आले. यावेळी इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून तसेच विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी, वारकरी या रूपात वेशभूषा करून त्यांनी पायीवारी दिंडी सोहळ्याचा आनंद लुटला.सदर संकल्पना शालेय शिक्षण कमिटी प्रमुख सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य डी.बी वाळुंज, तसेच मुख्याध्यापक सुनील ठिकेकर तसेच सर्व वर्गशिक्षक व विद्यार्थ्यांचे पालक यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले.आपली पारंपारिक वारकरी संप्रदायची परंपरा याचे प्रत्यक्ष शिक्षण व विद्यार्थ्यांमध्ये विठुरायाविषयी भक्तीभाव दृढ व्हावा या कारणाने कामिका एकादशीचे औचित्य साधून प्रतिकात्मक पायीवारी दिंडी सोहळा याचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ते वडगाव आनंद गाव आयोजन करण्यात आले.शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन दिंडी सोहळ्याचा आनंद लुटला.यामध्ये पायी वारी दिंडी सोहळा बरोबरच फुगडी व मानाचे समजले जाणारे ऐतिहासिक रिंगण सोहळा विद्यार्थ्यांनी प्रतीकात्मक स्वरूपात याची देही याची डोळा अनुभवला. ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय हरी विठ्ठल, जय जय राम कृष्ण हरी, रूप पाहता लोचनी अभंग गायन करीत जयघोष करीत विद्यार्थ्यांनी मोक्षधाम मंदिर, वडगाव आनंद येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे टाळ मृदुंग वाजवीत विठ्ठल-रुक्मिणी चे दर्शन घेतले.शिवाय यावेळी भजनी मंडळ मार्फत भजन आयोजित करण्यात आले.यावेळी हरी नाना देवकर, रंजन शिंदे, रामुनाना देवकर, पोपट गागरे, शांताराम गागरे, पांडुरंग गागरे, विठ्ठल गडगे, साहिल गडगे, रवी औटी, रोहित गागरे, निवृत्त मेजर लांडे, पोलीस पाटील दत्तात्रय चौगुले, गणेश चौगुले, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सतीश भिंगारदिवे, संदेश काशिकेदार, जया देवकर, दीपाली गडगे, रेश्मा कुटे, प्रमोद गडगे, सुनील ठिकेकर, सहशिक्षिका वृषाली कालेकर, मनिषा इले, संगीता कुदळे, गौरी डुंबरे आदी मान्यवर, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे