सह्याद्री व्हॅलीच्या पायल वारे चा देशात डंका; राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक

1 min read

राजुरी दि.१३:- राजुरी (जुन्नर) येथील सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी ची विद्यार्थिनी पायल वारे हिने पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. या स्पर्धेतील उत्तुंग यशाबद्दल सह्याद्री व्हॅली इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने पायल वारे या विद्यार्थ्यांनीचा विशेष सत्कार करण्यात आला. पायल वारे या विद्यार्थिनीला निलेश शेलार (अध्यक्ष किक बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्य) व प्रशिक्षक नितीन शेलार आणि तिचे वडील अशोक वारे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाच्या वतीने तिला विशेष पाठबळ देण्यात आले.या कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून कॉलेजचे चेअरमन व्ही. आर. दिवाकरण, संचालक सचिन चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय झोपे, उपप्राचार्य पी. बालारामडू व सर्व स्टाफ व सर्व विद्यार्थी यांनी पायलचे अभिनंदन केले व तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे