परिषद प्राथमिक शाळा निमगाव सावा येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
1 min read
निमगाव सावा दि.११:- गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य अभावी त्यांच्या शिक्षणात अडचण येऊ नये, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये या दृष्टीने निमगाव सावा येथील दानशूर व्यक्तीमत्व विजय गणपत गाडगे (संस्थापक अध्यक्ष श्री. स्वामी समर्थ पतसंस्था निमगाव सावा ) यांचे मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव सावा येथील होतकरु व गरिब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.हे शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. अभ्यासासाठी या साहित्याचा विद्यार्थ्यांना निश्चितच उपयोग होईल. याप्रसंगी गावातील विविध मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. विजय गणपत गाडगे (समर्थ फर्टीलायझर ), ह.भ.प. खाडे महाराज, गणेश थोरात – अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती पंडित नेहरू विद्यालय,इरफान भाई पटेल – अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती निमगाव सावा.
जाकिर पटेल – माजी अध्यक्ष शाळा व्यवस्था समिती निमगाव सावा, हरुण पटेल, डॉ.पोपट थोरात, साजिद पटेल, लहू गोफणे- मुख्याध्यापक संतोष साळुंके, शोभा गोंदके, जयश्री जावळे, मटाले मॅडम, प्रशाली डुकरे,आशा चुकाटे, शाइस्ता मॅडम, इतर ग्रामस्थ व पालक याप्रसंगी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष साळुंके यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक लहू गोफने यांनी आभार व्यक्त केले.