समर्थ इन्स्टिट्युट ऑफ पॅरा मेडिकल सायन्स चा उत्कृष्ठ निकाल

1 min read

बेल्हे दि.११:- महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२३ या परीक्षेमध्ये समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मधील विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याची माहिती प्रा.शुभम पाटे यांनी दिली.त्यामध्ये ऐश्वर्या बांगर ७७.८२ टक्के मिळून प्रथम आली. त्याचप्रमाणे पूजा शिरतर ७७.३६ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर अंकिता कुटे ७५.३६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.श्रीनाथ पडवळ ७३.६४ टक्के आणि शुभांगी तट्टू ७३.३६ टक्के गुण मिळवून यश संपादन केले.समर्थ रूरल एजुकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल,बेल्हे (ता.जुन्नर) येथे “पॅरामेडिकल क्षेत्रातील करियरच्या संधी” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. प्रा.राजीव सावंत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व माहिती देताना प्रा.राजीव सावंत म्हणाले कि,पॅरामेडिकल सायन्स चा हा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारीत असलेला व्यवसायाभिमुख पदवीचा अभ्यासक्रम आहे.ए डी एम एल टी म्हणजेच ऍडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रम समर्थ संकुलामध्ये सुरु झालेला आहे.सदर अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यता प्राप्त उत्तर पुणे जिल्ह्यातील एकमेव अभ्यासक्रम आहे.या अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता बी.एस्सी केमिस्ट्री,झुलॉजी,बॉटनी,मायाक्रोबायोलॉजी हे अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.एक वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्याला बोर्डाच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेला सामोरे जावे लागते.त्यानंतर सहा महिने हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करणे गरजेचे असते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रक्त,लघवी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी नोंदणीकृत परवाना प्राप्त होतो.प्रयोगशाळा पर्यवेक्षक,सहाय्यक,तंत्रज्ञ म्हणून काम करण्याची संधी,खाजगी किंवा शासकीय हॉस्पिटल मध्ये प्रयोग शाळा सहाय्यक,पर्यवेक्षक म्हणून नोकरीची संधी,विषाणू संशोधन संस्थांमध्ये,रक्तपेढी,लस उत्पादन संस्था,फार्मास्यूटिकल्स कंपन्यांमध्ये नोकरीच्या अनेकविध संधी उपलब्ध असल्याचे प्रा.राजीव सावंत यांनी सांगितले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके व विश्वस्त वल्लभ शेळके यांनी अभिनंदन केले.सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी डॉ.संतोष घुले-८३१९६३२२४८,प्रा.सचिन दातखिळे-९९६०६०१५५३,प्रा.शुभम पाटे-८९५६८७७२७६,७७७६००६५९० यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे