सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामभाऊ सातपुते यांची औरंगपूर शाळा भेट

1 min read

औरंगपूर दि.११:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा औरंगपूर (ता.जुन्नर) येथे सेवानिवृत्त राज्यआदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रामभाऊ सातपुते यांनी शाळेला भेट दिली. मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त होऊन 12 वर्ष झाले तरी केवळ शिक्षणाची आवड व विद्यार्थ्यांविषयी प्रेम असल्याने जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये भेट देत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांचा हा शाळा भेटीचा व्यासंग खूपच प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांना प्रेरक आहे. अनेक शाळांमध्ये शिष्यवृत्ती धारक मुलांसाठी त्यांनी भरघोस अशी बक्षिसे जाहीर केली आहेत.याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रज्ञाशोध परीक्षा तसेच गुणवत्ता विकास याबत मार्गदर्शन केले.आगामी काळात अध्यक्ष चषक स्वच्छ विद्यालय इत्यादी स्पर्धांमध्ये शाळेने सहभाग घेऊन यश मिळवावे अशा शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे इयत्ता पाचवीचा वर्ग भविष्य काळात सुरू करून शिष्यवृत्तीचे वर्ग सुरू करावे याबाबतही त्यांनी अधिक मार्गदर्शन केले. शालेय परिसर, वृक्षारोपण डिजिटल शाळा, रेन वॉटर हार्वे्टिंग, बोलका व्हरांडा तसेच 100 टक्केविद्यार्थी उपस्थीती पाहून समाधान व्यक्त करत शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले.
याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत साळवे यांनी त्यांचा छोटासा सन्मान केला. उपशिक्षक शंकर डुकरे यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे