श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कूल मध्ये मातृ-पितृ पूजन सोहळा उत्साहात साजरा

1 min read

शिक्रापूर दि.१०:- गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कूलमध्ये मातृ-पितृ पूजन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना अत्यंत मोलाचे स्थान दिलं जाते. मातृदेवो भव, पितृदेवो भव असं म्हटले जाते. म्हणजेच आई वडिलांना देवाप्रमाणे स्थान भारतीय संस्कृतीमध्ये दिले जाते. शालेय जीवनामध्ये शिक्षकांना आपण जसे गुरु मानतो तसेच आपल्या जीवनामध्ये आपले पहिले गुरू म्हणजे आपले आई वडील असतात. आयुष्य म्हणजे एक दिवा आहे आणि या दिवेला उजेडात आणणारी ज्योत म्हणजे आई-वडील असतात. अशा या आई-वडिलांचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही परंतु त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. आई-वडिलां बाबत प्रेम ,कृतज्ञता व आदर व्यक्त करण्यासाठी सिद्धिविनायक पब्लिक स्कूल मध्ये’ मातृ-पितृ पूजन’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली त्याप्रसंगी पालक प्रतिनिधींनी सरस्वती पूजन केले. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक सोमनाथ सायकर, चेअरमन मनीषा सायकर,विश्वस्त साकोरे, विश्वस्त अक्षय गायकवाड ,विश्वस्त सपना सायकर, प्राचार्य गौरव खुटाळ सर्वांनी सरस्वती पूजन केले. याप्रसंगी स्कूल मधील विद्यार्थिनींनी आपल्या आई-वडिलांचे प्रेम आपल्या प्रति किती निस्वार्थ असते हे दाखवून देण्यासाठी नृत्य सादर केले. ते पाहूनच सगळ्यांचे डोळे भरून आले. तसेच श्रद्धा जुने, आदिती बनारसे, स्वराली बीरंगडी, या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतामधून आपल्या आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आई वडील यांचे आपल्या जीवनामधील स्थान किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षक प्रतिनिधी म्हणून ज्योती चव्हाण यांनी आपल्या मनोगतामध्ये भारतीय परंपरेमध्ये आई-वडिलांचे स्थान किती महत्त्वाचे असते हे मुलांना समजावून सांगितले पुराणामधील श्रावण बाळाची गोष्ट सांगून मुलांना पटवून दिले. आई-वडिलांना आपल्या संस्कृतीमध्ये देवाचे स्थान दिले आहे तसेच आई-वडील आपल्यावर संस्कार करतात आपले हट्ट पुरवतात आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून त्या आपल्या मुलांना सुखी ठेवण्यासाठी कसे प्रयत्न करतात स्वतः दुःखाचे चटके सहन करून आपल्या मुलांना सुख कसे मिळेल याचा ते प्रयत्न करतात हे संस्थेचे प्राचार्य गौरव खुटाळ यांनी मुलांना आपल्या मनोगतामधून सांगितले. विश्वस्त साकोरे सर यांनी आपल्या मनोगता मधून मुलांना आपल्या आई-वडिलांप्रती आपले जे काही कर्तव्य आहेत ते समजावून सांगितले.कार्यक्रमाच्या वेळी मुलांकडून आपल्या मातापित्यांचे चरण देवाप्रमाणे धुवून गंध,पुष्प तसेच अक्षदा वाहून पूजा करण्यास सांगितले गेले. आपल्या प्रती आपल्या मुलांचे प्रेम पाहून पालक गहिवरले गेले व त्यांनी आपल्या पाल्याला कडकडून मिठी मारली. हा क्षण पाहिल्यानंतर प्रत्येकाचे मन भारावून आले. हा सुखद क्षण अनुभवताना परिसरातील सर्व वातावरण आनंदाने गहिवरलेले होते. श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कूल ने आपल्या मुलांच्या मनामध्ये रोवलेले संस्कार त्यावेळी दिसून आले. कार्यक्रमाच्या शेवटी पालक प्रतिनिधी म्हणून प्रियांका सपकाळे व संतोष शिंदे यांनी सिद्धिविनायक स्कूलचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमांमध्ये सहशालेय उपक्रम विभाग, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ड्रायव्हर काका, ऑंटी या सर्वांनी सहभाग घेतला होता. अतिशय सुंदर व भाऊक वातावरणामध्ये ‘मातृ-पितृ पूजन’ कार्यक्रम संपन्न झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे