मॉडर्न मध्ये शेकडो विद्यार्थांनी केले मातृ-पितृ पूजन

1 min read

बेल्हे दि.१०:-मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बेल्हे (ता.जुन्नर) या शाळेत गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून विद्यार्थांनी मातृ-पितृ पूजन केले. विद्यार्थांनी आपल्या आई वडिलांचे पुष्प गुच्छाने स्वागत केले.त्यांची पूजा करून औक्षण केले तर माता पित्यानी मुलांना आशीर्वाद दिले. मोबाईलच्या जमान्यात सर्वजण संस्कार शिस्त विसरत चाललेले आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांवर संस्कार होणे खूप गरजेचे आहे. या प्रेरनेत मातृ-पितृ पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी शाळेच्या प्राचार्या विद्या गाडगे विद्यार्थ्यांना आई वडिलांचे महत्व पटवून सांगताना म्हणाल्या की, मुलांनी पालकांचा आदर केला पाहिजे. यासाठी पालकांनी मुलांसमोर आपल्या आई-वडिलांचा म्हणजे घरातल्या वृद्ध व्यक्तींचा आदर ठेवावा. त्यांची काळजी घ्यावी म्हणजे विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार होण्याची सुरुवात शाळेतून व घरातूनच होत असते.या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी संकल्प केला की आम्ही आई-वडिलांची आज्ञा पाळू, अभ्यास करू आणि देशाचे चांगले नागरिक होऊ.कार्यक्रमाच्या वेळी मुलांकडून आपल्या मातापित्यांचे चरण पूजन करून गंध,पुष्प तसेच अक्षदा वाहून पूजा करण्यात आले. आपल्या प्रती आपल्या मुलांचे प्रेम पाहून पालक गहिवरले गेले व त्यांनी आपल्या पाल्याला कडकडून मिठी मारली. हा क्षण पाहिल्यानंतर प्रत्येकाचे मन भारावून आले. हा सुखद क्षण अनुभवताना परिसरातील सर्व वातावरण आनंदाने गहिवरलेले होते. मॉडर्न स्कूल ने आपल्या मुलांच्या मनामध्ये रोवलेले संस्कार त्यावेळी दिसून आले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त दावला कणसे, प्राचार्या विद्या गाडगे,उपप्राचार्य के.पी.सिंग, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे आई वडील मोठ्या संख्येने उपस्तीत होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे, सर्व संचालक मंडळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे