दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने भिसे कुटुंबीयांनाच ठरवले दोषी
1 min read
पुणे दि.४:- पुण्यातील मंगेशकर रुग्णालयाकडून पैशांअभावी झालेल्या अडवणुकीमुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणास रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर महिलेच्या मृत्यू प्रकरणी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात समिती स्थापन करून अहवाला तयार केला.यात डॉक्टर धनंजय केळकर यांच्या सह आणखी दोन डॉक्टरांचा समावेश आहे.भिसे कुटुंबीयाने हॉस्पिटलचे आदेश पाळले नाहीत आणि रागातून खोटी तक्रार दिली असे या अहवाल नमूद करण्यात आले आहेत. तसेच हॉस्पिटल कडून कुठलेही पैसे आम्ही मागितले नव्हते मात्र आमच्या विरोधात खोटी तक्रार करण्यात आली.
सरकारकडून आता या अहवालावर काय होतं आणि या प्रकरणाची सरकार चौकशी करून काही कारवाई करत का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.विविध संघटना, पक्ष आक्रमक दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचे प्रकरण शुक्रवार सकाळपासून तापलेले पहायला मिळत आहेत.
रुग्णालयाबाहेर सकाळपासून विविध संस्था,संघटना, राजकीय पक्ष यांनी आंदोलनाला सुरुवात केली. घोषणाबाजी करून निषेधाचे फलक दाखवण्यात आले. रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
शिवसेना (उद्धव ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट), पतित पावन संघटना, युवक काँग्रेस, आरपीआय, संगीता तिवारी यांची गुलाबो गॅंग अशा विविध गटांकडून रुग्णालय प्रशासनाचा निषेध करण्यात आला. रुग्णालय प्रशासनावर कारवाई व्हावी, मृत महिलेला न्याय मिळावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
जिल्हाधिकारी काय म्हणाले?
पुण्यात घडलेल्या या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी म्हटलं आहे की, “या घटनेची आम्ही नोंद घेतली आहे. संबंधितांवर उचित कारवाई करणार आहोत. भाडेतत्वावर कोणालाही जमीन देताना काही अटी असतात त्या अटी-शर्थी बघून निर्णय घेऊ. याप्रकरणी कडक कारवाई करणं आवश्यक आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर नेमकं काय घडलं होतं, हे कळणार आहे. दोन दिवसात हा अहवाल देण्यास आम्ही सांगितलं आहे,” अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.