नवसह्याद्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळणार आंतराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी करण्याची संधी

1 min read

भोर दि.९:- नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिटूटीन्स इंजिनीरिंग कॉलेज नायगाव (ता.भोर) च्या विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी नुकताच इजुब्रिज इंडिया कंपनी सोबत ट्रैनिंग व प्लेसमेंट साठी सामंजस्य करार करण्यात आला, यामध्ये विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॅपजिमिनी कंपनीचे ट्रैनिंग मिळणार असून प्लेसमेंट मिळणार आहे असं संस्थेचे अध्यक्ष पोपटराव सुके यांनी माहिती दिली. सामंजस्य करारावर सही करताना विद्यार्थ्यांना अदयावत आणि टेकनिकल शिक्षण मिळणार यामध्ये विविध तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम कोर्सेसचे प्रात्यक्षिक करायला मिळणार असून आंतराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळणार आहेत असे प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी यांनी सांगितले. इजुब्रिज इंडिया कंपनीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या प्रमुख सोनाली फुलसुंदर यांनी विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानावर आधारभूत असणारी कौशल्यांचा विकासासाठी कॅपजिमिनी कंपनीच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार असून, ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना आंतराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळेल असा आशावाद व्यक्त केला. संस्थेच्या वतीने संस्थेचे डायरेक्टर सागर सुके यांनी या प्रोग्रॅमला शुभेच्छा दिल्या. संगणक विभागाचे प्रमुख प्रा. चंदन वाघ सरांनी प्रास्ताविक केले व विभागाचे ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी प्रा. भूषण बोऱ्हाडे सरांनी या सामंजस्य करार घडवून आणण्यासाठी महत्वपूर्ण काम पहिले व उपस्थितांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे