२०२४ ची निवडणूक लढणार नाही:- आमदार अतुल बेनके; मला दोन्ही पवार सारखेच

1 min read

जुन्नर दि.९:- राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आपण तटस्थ राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. शरद पवार आमचे दैवत असून अजित पवार आमचे नेते आहेत. यावेळी आपण 2024 ची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचेही जाहीर केले. आमदार बेनके यांनी घेतलेल्या निर्णयाने तालुक्यातील घडामोडींवर सध्या तरी पडदा पडला आहे.बेनके परिवाराला पवार कुटुंबीय घरातील असून त्यांच्याबरोबर आमची राजकीय कारकीर्द घडली आहे. त्यामुळे माझी द्विधामनस्थितीती असल्याने तटस्थ भूमिका घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून 2004 नंतर तालुक्यात अनेक विकासकामे झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत.आमदार बेनके म्हणाले, तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच मी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. माझे वडील व माजी आमदार वल्लभ बेनके यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली तालुक्याची विकासकामे मार्गी लावली आहेत. तर वल्लभ बेनके यांना सहावेळा विधानसभेची उमेदवारी देऊन त्यांनी चारवेळा निवडणुकीत विजय मिळवला आहे.माजी आमदार वल्लभ बेनके यांना दोनवेळा मंत्रिपदाला हुलकावणी मिळाली असली तरी त्यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. उलट त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी धरणे, कालवे आणि बंधाऱ्यांच्या माध्यमातून शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून तालुक्याचा विकास केल्याचे त्यांनी नमूद केले.

अजित पवार तितकेच महत्त्वाचे…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2004 नंतर जुन्नर तालुक्याला भरीव मदत केली आहे. चिल्हेवाडी धरणाच्या पाइपलाइनचा प्रश्न, आदिवासी मुलांसाठी वसतिगृह, हिरडा उत्पादकांचा प्रश्न, शिवनेरी विकास आराखडा, पिंपळगाव जोगा धरण, येडगाव धरणाजवळील यशवंतराव चव्हाण स्मारक, शेतकऱ्यांसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यायावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नर तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रकाश ताजणे, जिल्हा परिषदेचे माजी नियोजन सदस्य विकास दरेकर. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष उज्ज्वला शेवाळे, कात्रज डेअरीचे संचालक भाऊ देवाडे,श्रीराम पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी डेरे, विनायक तांबे, बाळासाहेब खिलारी, शहराध्यक्ष रोहिदास केदारी, अजिंक्यतारा पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे, उपसरपंच ज्योती संते, वैष्णवी चतुर, अक्षदा मांडे व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. माध्यमातून शून्य टक्के व्याजदराने पुरवठा व कोविड काळात मोलाची मदत केली असल्याने अजित पवार मला तितकेच महत्त्वाचे आहेत.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नर तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रकाश ताजणे, जिल्हा परिषदेचे माजी नियोजन सदस्य विकास दरेकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष उज्ज्वला शेवाळे, कात्रज डेअरीचे संचालक भाऊ देवाडे,श्रीराम पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी डेरे, विनायक तांबे, बाळासाहेब खिलारी, शहराध्यक्ष रोहिदास केदारी, अजिंक्यतारा पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे, उपसरपंच ज्योती संते, वैष्णवी चतुर, अक्षदा मांडे व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे