“विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती” जुन्नर तालुक्यात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम; तर आमदार अद्याप नॉटरीचेबल

1 min read

जुन्नर दि.७:- राज्याच्या सत्तापटावर झालेल्या भूकंपानंतर जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ नेते आणि तरूण नेते अजून संभ्रमात आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यापैकी कोणता झेंडा घेऊ हाती, अशी अवस्था राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये झाली आहे.या सर्व राजकीय घडामोडी घडत असताना तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी तटस्थ भूमिका घेतली असून सध्या ते नॉटरीचेबल आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजित पवार यांनी मुंबई येथे बुधवारी (दि. ५) घेतलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यात तालुक्याचे आमदार अतुल बेनके अनुपस्थित असल्याने त्यांची भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही. जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी शरद पवार यांच्या विचाराला मानणारी असली तरी अजित पवार यांनी आमदार अतुल बेनके यांच्या मतदारसंघातील अनेक कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे आमदार बेनके यांची द्विधा मनःस्थिती झाली असून ते शरद पवार किंवा अजित पवार यांच्यापैकी कोणत्याही एका गटासोबत गेल्यास तालुक्यातील राजकीय परिस्थितीत उलथापालथ होणार हे निश्चित आहे.आमदार नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतील असे बोलले जात आहे.

माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या प्रयत्नातून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुक्यातील शेतीच्या पाण्याची समस्या व इतर विकास कामे मार्गी लागल्याने शरद पवार गटात जाण्याचा दबाव वाढत आहे.

आमदार सद्या आजारी असल्याने ते पुणे येथे उपचार घेत आहेत.आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहोत.येत्या ४ ते ५ दिवसांत आम्ही याबतचा निर्णय जाहीर करू.”

पांडुरंग पवार
तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे