समर्थ संकुल ठरतंय वरदान “समर्थ आय टी आय” च्या ६८ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यामध्ये निवड

1 min read

बेल्हे दि.६:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय टी आय) बेल्हे (ता.जुन्नर) येथील आय टी आय च्या विद्यार्थ्यांसाठी नुकतेच “कॅम्पस ड्राईव्ह २०२३” चे आयोजन करण्यात आले होते.या कॅम्पस ड्राईव्ह मध्ये ६८ विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती प्राचार्य पांडुरंग हाडवळे यांनी दिली.विद्यार्थ्यांना युवाशक्ती फाउंडेशन पुणे व जी टी टी फाऊंडेशन पुणे यांच्या सहकार्याने महिंद्रा सी आय ई,प्रोफाईव्ह इंजिनिअरिंग प्रा.लि.पुणे,डॉल्फिन इंजिनियर्स अहमदनगर आदि कंपन्या या कॅम्पस ड्राईव्ह घेण्यासाठी समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे आपल्या सहकार्यांसोबत सहभागी झाल्या होत्या.सदर मुलाखतीसाठी प्रोफाईव्ह इंजिनिअरिंग प्रा.लि.या कंपनीचे प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह कमलेश डावरे,एच आर मॅनेजर किरण थोरात उपस्थित होते.आय टि आय विभागातून या कंपनीमध्ये ५ प्रशिक्षणार्थ्यांची ट्रेनिंगसाठी निवड करण्यात आली.तसेच डॉल्फिन इंजिनियर्स अहमदनगर या कंपनीचे क्वालिटी मॅनेजर तनपुरे आणि मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह तलोले सर यांनी मुलाखतीची निवड प्रक्रिया पूर्ण केली.त्यामध्ये ५ प्रशिक्षणार्थ्यांची ट्रेनिंग साठी निवड झाली.युवाशक्ती फाउंडेशन पुणे चे सोर्सिंग मॅनेजर आनंद जिर्गे,जी टी टी फाउंडेशन पुणे या सेवाभावी संस्थेचे प्लेसमेंट हेड अभिषेक सावेकर,महिंद्रा सी आय इ चाकण पुणे चे ऑपरेशन मॅनेजर मंगेश देवकर,फिल्ड ऑफिसर साळुंखे सर यांनी मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य,सॉफ्ट स्किल,काम करण्याची पद्धत याबाबत ची गुणवत्ता तपासून पाहिली.महिंद्रा सी आय ई या कंपनीमध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, मोटार मेकॅनिक व्हेईकल,रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, कंप्यूटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट(कोपा), डिप्लोमा कोर्स इन इलेक्ट्रिशियन, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल ई.विभागातील एकूण ४६ विद्यार्थ्यांची अप्रेंटिस पदासाठी निवड करण्यात आल्याची माहिती उपप्राचार्य विष्णू मापारी यांनी दिली.संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळक,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके यांनी निवड झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे