समर्थ फार्मसी महाविद्यालयामधील दहा विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील जी-पॅट परीक्षेत यशस्वी

1 min read

बेल्हे दि.४:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिटयूट संचलित समर्थ इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे (बांगरवाडी) येथील १० विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएट फार्मसी एप्टिट्यूड टेस्ट (जी-पॅट-२०२३) या राष्ट्रीय परीक्षेत यश संपादन केल्याची माहिती प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की व डॉ.संतोष घुले यांनी दिली.अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणारी व औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्याना फार्मसी क्षेत्रात महत्वपूर्ण व प्रतिष्ठेची समजली जाणारी जी पॅट-२०२३ या परीक्षेत समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना औषधनिर्माण शास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेता यावा व शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा हे जी पॅट परीक्षेचे उद्दिष्ट आहे.यामध्ये समर्थ फार्मसी महाविद्यालयातील तृतीय व अंतिम वर्षातील विद्यार्थी सहभागी झाले होते.त्यामध्ये ऑल इंडिया रँकिंग स्कोर पुढीलप्रमाणे:
विद्या दिनकर अदक-ऑल इंडिया रँकिंग स्कोर १२८५.
ओंकार भास्कर ढोमसे-ऑल इंडिया रँकिंग स्कोर १३७१
प्रणाली सुभाष औटी-ऑल इंडिया रँकिंग स्कोर १४३९
निलेश महादेव गोरड-ऑल इंडिया रँकिंग स्कोर ४६२०
मयुरेश अनंत भोंडविले-ऑल इंडिया रँकिंग स्कोर ६०४१०
आदित्य अजय परकाळे-ऑल इंडिया रँकिंग स्कोर ६४९९
निकिता मारुती सुपे-ऑल इंडिया रैंकिंग स्कोर ९४३४
असित जीवन शिरसाट-ऑल इंडिया रँकिंग स्कोर १४२०८
वैष्णवी बाळासाहेब गुगळे-ऑल इंडिया रैंकिंग स्कोर २१०७६
रेखा गुलाब सूर्यवंशी-ऑल इंडिया रँकिंग स्कोर २४१६८
संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके व सचिव विवेक शेळके यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर आदी उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन विभागप्रमुख प्रा. सचिन दातखिळे व डॉ.बिपीन गांधी यांनी केले. आभार जी-पॅट कोऑर्डिनेटर प्रा.शुभम गडगे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे