मातोश्री ग्लोबल स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
1 min read
कर्जुले हर्या दि.४:-मातोश्री ग्लोबल स्कूल व ज्युनियर कॉलेज कर्जुले हर्या (ता.पारनेर ) येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी मातोश्री ग्लोबल स्कूल च्या प्राचार्या शितल आहेर, शाळेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश व्यास व शिक्षक वृंदांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. या प्रसंगी प्रकाश व्यास यांनी गुरुपौर्णिमे बद्दल गुरू शिष्या मधील नाते व प्रत्येकाच्या आयुष्यातील गुरूंचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातून गुरूंचे महत्त्व सांगितले. या प्रसंगी मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मिराताई आहेर, विश्वस्त डाॅ. दिपक आहेर, सेक्रेटरी किरण आहेर, प्राचार्या शितल आहेर कार्यालयीन अधीक्षक यशवंत पाफाळे व शिक्षक वृंदांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रानी रासकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संध्या निवडूंगे यांनी केले.