श्री.जे.आर गुंजाळ इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे औक्षण करून केले स्वागत; गुरुप्रेम वृक्ष देऊन केले व्यक्त
1 min read
आळेफाटा दि.३:- श्री.जे.आर गुंजाळ इंग्लिश मिडीयम स्कूल आळेफाटा (ता.जुन्नर) मध्ये अनोखी गुरुपौर्णिमा साजरी झाली. शाळेच्या वर्धापन दिनाचे व गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी शिक्षकांना अनोखी भेट म्हणून वृक्ष दिले.विद्यार्थ्यांनी शिक्षकांना वृक्ष देऊन अनोखी गुरुपौर्णिमा साजरी केली.
हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु, जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु, अशा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप गुंजाळ,तसेच सेक्रेटरी मीना गुंजाळ यांनी सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
स्कूलचे प्राचार्य सतीश पाटील तसेच पर्यवेक्षक विठ्ठल म्हस्के व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे औक्षण करून स्वागत केले.विद्यार्थी जीवनातील गुरुचे स्थान व त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांनी आपापल्या भाषणांमधून सांगितले. गुरु बद्दल असणारे प्रेम विद्यार्थ्यांनी वृक्ष देऊन व्यक्त केले.
गुरु आपल्याला वेगवेगळे मार्ग दाखवतात. शालेय जीवनात गुरूंना खूप महत्वाचे स्थान आहे.गुरु म्हणजे माता, गुरु म्हणजे पिता.आपल्याला जीवनात वेगवेगळे गुरु भेटतात.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.