सरदार पटेल हायस्कूल आणे येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

1 min read

आणे दि.३ :- सरदार पटेल हायस्कूल आणे येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून नळवणे गावच्या सरपंच अर्चना उबाळे उपस्थित होत्या.

या वेळी पठार विकास संस्था आणे चे पदाधिकारी व 2001 बॅचचे माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गुरुंविषयी कृतज्ञता आपल्या भाषणांतून व्यक्त केली तसेच इ. 10 वी च्या विद्यार्थ्यांनी गुरुंचा श्रीफळ देऊन आदरसत्कार केला. गुरुपौर्णिमेची महती कथन करताना पेमदरा गावचे उपसरपंच बाळासाहेब दाते यांनी सानेगुरूजींची कविता सादर केली.माजी विद्यार्थी प्रकाश दाते, प्रदिप आहेर, रोहिदास दाते यांच्या पुढाकारातून गणवेशाचे वितरण करण्यात आले तसेच पठार विकास संस्थेच्या वतीने वह्या देण्यात आल्या.गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने खाऊ वाटप देखील करण्यात आले. या प्रसंगी पठार विकास संस्थेचे खजिनदार तुषार आहेर, मुक्ताजी दाते, पिंटू गुगळे, सुखदेव निकम,पाटिलबा गाडेकर,सुरेश बेलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे