सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे ऑलिंपियाड स्पर्धेत घवघवीत यश

1 min read

राजुरी दि.१ :- महारिया चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल राजुरी (ता.जुन्नर) 2022- 23 या शैक्षणिक वर्षात शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी व गणित या विषयांसाठी ऑलिंपियाड स्पर्धेत भाग घेतला होता.

त्यामध्ये विद्यार्थ्यांनी जिल्हा व राष्ट्रीय स्तरावर क्रमांक पटकावून चांगले गुण संपादन केले. त्यामध्ये इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी स्वरा अनंत दाभाडे व माहे नाज अन्वर चौगुले तसेच श्लोक दिनकर गटकळ या विद्यार्थ्यांनी पाचव्या क्रमांकाचे बक्षीस मिळवले. इयत्ता दुसरीतील विद्यार्थी अथर्व मस्कुले व संस्कार बश्याल या विद्यार्थ्यांनी देखील चांगले यश संपादन केले आहे.

या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक म्हणून सीमा पाडेकर व सलमा चौगुले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे व्यवस्थापक, प्राचार्य व सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे